Skip to main content

दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी २४ जूनला सिडकोला घेराव

पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी १० जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळीच्या आंदोलनानंतर आता २४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आणि त्या अनुषंगाने या आंदोलनात किमान ०१ लाख लोकांचा सहभाग असणार असून त्यावेळेस पुढील आंदोलनाचीही घोषणा करण्यात येणार आहे, असे आज (दि. १५) पनेवलमध्ये झालेल्या बैठकीतून स्पष्ट झाले.           आगरी समाज हॉल येथे झालेल्या रायगड व नवी मुंबई विभागाच्या बैठकीस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कॉ.भूषण पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा परिषेदचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, जे. डी. तांडेल, दीपक म्हात्रे, दीपक पाटील, रुपेश धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, दशरथ भगत, नंदराज मुंगाजी, साई संस्थानचे विश्वस्त रवी पाटील, नगरसेवक मनोज भुजबळ, डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, जयेश आकरे, धीरज कालेकर, राजेश गायकर, सीमा घरत, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते, युवा नेते राजेश मपारा, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, तसेच विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.            नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने लढा उभारला आहे.त्यांना प्रकल्पग्रस्त तसेच सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला. १० जूनला रायगड ते नवी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, ते मुंबई असा 'भूतो न भविष्यतो' मानवी साखळी आंदोलन भव्य स्वरूपात झाले. याची दखल संपूर्ण महाराष्ट्रांनीच नाही तर देशाने घेतली. या आंदोलनाच्या नंतर लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी २४ जूनला सिडकोला घेराव घालण्याचे नियोजन जोरात सुरु आहे. त्या अनुषंगाने आजच्या बैठकीत आंदोलनांच्या नियोजनासंदर्भात सखोल चर्चा झाली.   यामध्ये भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, स्थानिक, कृती समिती, संस्था संघटना, विविध राजकीय पक्षाचे गाव ते शहरातील किमान ०१ लाख जणांचा समावेश असणार आहे. आणि तशी जय्यत तयारी आहे.  यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी, १० जूनचे मानवी साखळी आंदोलन यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे यासाठी आता २००८ साली मागणी झाल्याचे समोर आले असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळाचे काम अद्यापही पूर्णत्वास आले नसल्याने साहजिकच नामांतराचा विषय नव्हताच. परंतु अचानकपणे ना. एकनाथ शिंदे  यांची मागणी आणि सिडकोच्या ठरावाने भूमिपुत्राला दुखावले. या अनपेक्षित मागणीमुळे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला विरोध करण्याचा डाव उघडकीस आला. त्या अनुषंगाने जासई येथे झालेल्या बैठकीत दिबांच्या नावासाठी रणशिंग फुंकण्यात आले. त्यानंतर आंदोलनाच्या तयारीला सुरुवात झाली . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेला कृती समितीला बोलावले तसेच महाविकास आघाडीच्या स्थानिक पुढाऱ्यांना पाचारण केले. त्या बैठकीत कृती समितीने ठामपणे दिबासाहेबांचेच नाव पाहिजे हि भूमिका मांडली मात्र आता महाविकास आघाडीच्या पुढाऱ्यांनी लोकांमध्ये संभ्रम सुरु केला आहे. असे असले तरी दिबांच्या नावाला दुसरा पर्याय नाही हे आम्ही ठामपणे सांगितले आहे. प्रशांत पाटील यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ४० ते ५० संघटनांनी दिबांचे नाव देण्यासंदर्भात पत्र दिल्याचे म्हंटले आहे. मग एवढी निवेदने दिली असतानाची माहिती असताना दिबासाहेंबाच्या नावाला का विरोध करता असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच त्यांचा विरोध दिबासाहेबांच्या नावाला आहे, तो विरोध सहन करायचा नाही. २४ जूनला घेरावाच्या पार्श्वभूमीवर आपल्यावर केसेस करतील. दिबासाहेबांना सीमेवरील आंदोलनात एक वर्षाची जेल झाली तर आम्ही केसेस कारवाईसाठी का घाबरावे असे सांगतानाच २४ तारखेचे आंदोलन शेवटचे नाही तर यापुढे या पेक्षा प्रखर आंदोलने केले जातील, असेही त्यांनी अधोरेखित केले.      यावेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले कि, दि. बा. पाटील साहेबांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे हि पहिल्यापासूनच सर्वांची मागणी आहे. या संदर्भात भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, ग्रामपंचायती, संस्था, संघटनांनीही मागणी केली आहे. या अनेक मागण्या असताना नामदार एकनाथ शिंदे यांची एक मागणी येते आणि लगेच ठराव घेतला जातो, हि कुठली नीती आहे. भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी घाटकोपर-मानखुर्द लिंक उड्डाणपूलला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची आधी मागणी केली तरी शिवसेनेचे खासदार यांनी नंतर सुफी संत सुल्तानूल हिंद ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देण्याची मागणी केली यात किती फरक आहे बघा. त्यानंतर राहुल शेवाळेंनी ती मागणी मागे घेतली त्याचप्रमाणे ना. एकनाथ शिंदेंनी दिबांच्या नावाच्या सर्वप्रथम मागणीचा मान ठेवून आपले मन मोठे करावे, आणि विमानतळाला दिबासाहेबांचेच नाव द्यावे, असे यावेळी नमूद केले.  १० जूनला आंदोलनाची पहिली पायरी यशस्वी झाली. २४ जूनला सिडकोला घेराव आणि त्यानंतरही दिबांच्या नावासाठी टप्प्याटप्य्याने संघर्ष तीव्र करत राहू. २४ जूनच्या घेराव आंदोलनात पुढील आंदोलनाची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.  कोट-  १० जूनच्या आंदोलनाने फक्त दि. बा. पाटील यांचेच नाव पाहिजे हा संदेश देशभर पोहोचविला आहे. आंदोलनात कोणत्याही पक्षाचा झेंडा नव्हता फक्त दिबांसाहेब हाच ध्यास होता. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सारखी मंडळी पाठीशी आहेत, त्यामुळे या लढ्याला ताकद मिळाली आहे. आम्हाला कुठेही नको विमानतळालाच दिबांचे नाव पाहिजे हि भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर ठाम मांडली आहे. मी शिवसेनेचा उपनेता आहे पण दिबांसाठी आमचा संघर्ष कायम राहणार आहे. विरोधक आता अफवा पिकवण्याचे काम करत आहे त्यामुळे कृपा करून कुणीही समाजात तेढ निर्माण करू नये.      - दशरथदादा पाटील  कोट-  मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत कृती समितीने दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे हि ठाम भूमिका मांडली. असे असतानाही महविकास आघाडीतील काही पुढाऱ्यांकडून जनतेची जाणूनबुजून दिशाभूल करण्याचे पाप केले जात आहे. - जे. डी. तांडेल  कोट-  समाजातील फितूर झालेले नेते कॅमेऱ्यासमोर येऊन काहीही वक्तव्य करत सुटले आहेत. त्यांच्याकडून सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे. दिबांच्या नावाला विरोध करणाऱ्यांचा निषेध करू तेवढा कमी आहे. - के. के. म्हात्रे  चौकट-  चांगले करता येत नसेल तर वाईट करू नका   महाविकास आघाडीच्या स्थानिक पुढाऱ्यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला विरोध करून सर्व समाजाच्या भावना दुखावल्या.  युवा पिढी पासून महिला आणि वृद्धापर्यंत दुखावण्याचे काम महाविकास आघाडीच्या पुढाऱ्यांनी केले. त्यामुळे विशेषतत्वाने युवा पिढीने या बैठकीत बोलताना आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना समाजात गैरसमज पसरवू नका आणि चांगले करता येत नसेल तर वाईट करू नका, असा सल्ला वजा इशारा महाविकास आघाडीच्या पुढाऱ्यांना दिला. 

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...