खारघर (प्रतिनिधी)-3 जून हा लोकनेते मा.खासदार माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवस.लोकनेत्यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त "रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या"वतीने संपूर्ण पनवेल तालुक्यातील ७० हजार कुटुंबांना अन्न-धान्य वाटण्याचा संकल्प सोडला होता.गेल्या १० दिवसांपासून भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नगरसेवक यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे.
त्याचाच भाग म्हणून काल खारघरमधील सेक्टर-१५ येथील "घरकुल काँम्प्लेक्समध्ये"भाजपा खारघर-तळोजा मंडलचे पदाधिकारी मा.अमितजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना अन्न-धान्याची ७०० कीट वाटण्यात आली.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रामशेठ साहेबांनी दिलेल्या अन्न-धान्याच्या या कीटबद्धल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.याप्रसंगी मा.किशोर जाधव,पांढरे सर,आनंदा मोकाशी,संजय मुळीक,आनंद मुगदल,वाघमारे,इंडी तसेच इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment