पनवेल(प्रतिनिधी) राज्यामधील वीज कामगार, वीज अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देणेसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या संदर्भात दिलेल्या त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, राज्यातील सुमारे १६ कोटी जनता व सुमारे २ कोटी ८८ लाख वीज ग्राहकांना वीज पुरवठा मिळेल यादृष्टीने राज्यातील सुमारे ८६००० वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार अहोरात्र झटत आहेत. मार्च २०२० पासूनच्या लॉकडाऊन पासून आजपर्यंत कोरोना साथीच्या कालावधीत वीज पुरवठयावर अतिशय भार पडलेला आहे. कोव्हिड रूग्णालये यांना अखंड वीज पुरवठा करण्याचे काम हे वीज महामंडळातील सर्व कर्मचारी, अधिकारी अहोरात्र करीत आहेत. राज्याला फैयान व तौक्ते चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यामध्ये तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भामधील अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये वीजवाहक झाडांची मोडतोड होऊन बरेच वेळा वीज पुरवठा खंडीत झालेला वीजपुरवठा सुरू करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून युध्द पातळीवर काम केले आहे, याची आपणास कल्पना आहेच.
राज्यातील विद्युत महामंडळाच्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांच्या सेवा अत्यावश्यक गणल्या जात आहेत. तथापि, पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा दिला गेलेला नाही. पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचारी यांचे तुलनेत वीज महामंडळातील कर्मचाऱ्यांचे काम देखील तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे वीज महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या, अभियंत्यांच्या कामाचे महत्व विचारांत घेवून त्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा बहाल करावा व त्या अनुषंगाने वीज कर्मचारी व त्यांचे कुटूंब यांचे लसीकरण, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना देय आर्थिक लाभ देण्याचा तातडीने विचार व्हावा अशी वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते संघटना संयुक्त समिती यांनी मागणी केली आहे, त्यानुसार योग्य ती कार्यवाही व्हावी, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आहे.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment