पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः मराठा क्रांती मोर्चाची मुक आंदोलनाच्या नियोजनाच्या संदर्भात पनवेल येथील व्ही.के.हायस्कूल या ठिकाणी येत्या 18 जून रोजी सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र मूक आंदोलन छत्रपती संभाजी राजेंनी 16 जून पासून कोल्हापूर येथून आंदोलनाला सुरुवात करत आहेत. त्यानंतर नाशिक, संभाजीनगर, अमरावती आणि रायगडची 28 जून तारीख दिली आहे. असे पहिल्या टप्प्यात आंदोलने होणार आहे. रायगडची तयारी करण्यासाठी 18 जूनला जिल्ह्याची बैठक घ्यायची आहे तरी सर्व तालुक्यातील 4/5 समन्वयक मिटिंग ला येणे आवश्यक असल्याचे विनोद सदाशिव साबळे, सुनील पाटील, गणेश कडू, राजेश लाड, शंकर पवार, प्रदीप देशमुख, हरीश बेकावडे, रुपेश कदम, अविनाश पाटील, संतोष पवार, शरद गोळे, अनिल भोसले, शशिकांत मोरे, नरेश सावंत, चेतन सुर्वे, कमलाकर लबडे, संजोग मानकर, संतोष साप्ते, वाय सी जाधव यांनी सांगितले आहे.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment